Pune crime : बंडगार्डन पोलीस ठाण्यातून आरोपी पसार
Pune crime : बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या तपास कक्षातून अटक केलेला आरोपी पसार झाल्याची घटना उघडकीस आली.

Pune crime : बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या तपास कक्षातून अटक केलेला आरोपी पसार झाल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. (Pune crime)
वैभव अनिल खोत (वय १९, रा. श्रमिकनगर, टिंगरेनगर, विश्रांतवाडी) असे् पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस ठाण्यातून पसार झाल्या प्रकरणी खोत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी शहाजी ठवाळ यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोत याला बंडगार्डन पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केली होती. १९ जुलै रोजी त्याला अटक करण्यात आल्यानंतर त्याला तपास पथकाच्या कक्षात ठेवण्यात आले होते. त्याला बेडी घालण्यात आली होती. पहाटे चारच्या सुमारास खोत याने बेडीतून हात अलगदपणे काढून घेतला. (Pune crime)
तपास पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून तो पसार झाला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पुणे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासले. पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण तपास करत आहेत. (Pune crime)





