उरण हत्याकांड प्रकरणी आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलिस कोठडी

Uran Murder Crime | उरण येथील यशश्री शिंदे हत्याप्रकरणी आरोपी दाऊद शेखला कर्नाटकाच्या गुलबर्गातून अटक करण्यात आले. यानंतर आज कोर्टात हजर केल्यानंतर दाऊद शेखला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दाऊद शेखला पनवेल सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दाऊदने आपला गुन्हा कबुल केला आहे. त्यानेच यशश्री शिंदेची हत्या केली आहे. दरम्यान, उरणमध्ये यशश्री शिंदेचा आरोपी दाऊदने निर्घृण खून केला. त्याने यशश्रीला भेटण्यासाठी बोलावले होते, तेव्हा दोघांमध्ये वाद झाल्यानंतर दाऊदने तिच्यावर चाकूने वार केले.
आरोपीवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संबंधित तरुणीची छेड काढल्यामुळे आरोपीवर 2019 मध्ये पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला अटक करण्यात आली होती. मात्र सुटल्यानंतर आरोपीने पुन्हा तिच्याशी संपर्क केला होता. Uran Murder Crime |
दरम्यान, २५ जुलै रौजी उरणची यशश्री बेपत्ता झाली होती. ती बेलापुरमध्ये एका कंपनीत काम करत होती. मात्र बराच वेळ ती घरी परत न आल्याने वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी यशश्रीचा शोध सुरु केला होता. पोलिसांना यशश्रीचा मृतदेह रेल्वेस्टेशन जवळ आढळून आला. मृतदेहाची विटंबना करण्यात आली होती. यशश्रीची हत्या केल्यानंतर दाऊद फरार होता. चार दिवसानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. Uran Murder Crime |
हेही वाचा:





