घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी आरोपी भावेश भिंडेला अटक
Updated On:

मुंबई – मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला अखेर मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. या दुर्घटनेनंतर फरार झालेल्या भिंडेला राजस्थानच्या जयपूरमधून अटक करण्यात आली आहे.
या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू, तर ७५ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, होर्डिंग दुर्घटनेचे बचावकार्य ६३ तासांनी आज थांबविण्यात आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर हे बचावकार्य संपल्याची माहिती दिली.



