मुंबई क्राईम ब्रँचची मोठी कारवाई..! घाटकोपर दुर्घटनाप्रकरणातील आरोपी भावेश भिंडेला उदयपूर येथून अटक

Ghatkopar hoarding tragedy । मुंबईतील घाटकोपरमध्ये सोमवारी 13 मे रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे एका पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. याप्रकरणी मागील सुरू असलेले बचावकार्य काल १७ मेला तब्बल 63 तासांनी संपले आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घटनास्थाळाची पाहणी करत हे बचवकार्य संपल्याची घोषणा केली.
दरम्यान आज याप्रकरणी मुंबई पोलिसांनी राजस्थानमधील उदयपूरमध्ये मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडे याला पोलिसांनी अटक करून मुंबईत आणले आहे. भावेश हा त्या होर्डिंग कंपनीचा मालक आहे. मुंबई क्राईम ब्रँचने उदयपूरमध्ये गुप्त कारवाई केली या कारवाईत भावेश भिडेला अटक करण्या आली आहे. मुंबईतील अपघातानंतर भावेश उदयपूरमधील हॉटेलमध्ये लपला. अशी माहिती समोर येत आहे.
दरम्यान, मुंबई क्राईम ब्रँच भावेशचा देशभर शोध घेत होती. अखेर तो उदयपूर येथील एका हॉटेलमध्ये लपून बसलेला सापडला. मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर चार दिवसांनी याच प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे.
क्राइम ब्रँचची ही कारवाई इतकी गुप्त होती की, उदयपूर पोलिसांनाही त्याचा सुगावा लागू शकला नाही. मुंबईत लावण्यात आलेले होर्डिंग पूर्णपणे बेकायदेशीर आणि विनापरवाना होते. अशी माहिती समोर येत आहे.
आरोपींवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल
14 मे रोजी मुंबईत आलेल्या धुळीच्या वादळात भावेश भिंडे यांच्या कंपनीने लावलेला होर्डिंग कोसळल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात 14 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून 74 जण जखमी झाले आहे. एफआयआरमधील आरोपी भावेश भिंडे हा घटनेपासून फरार होता. त्याच्यावर यापूर्वीच बलात्काराच्या गुन्ह्यासह २० हून अधिक गुन्हे दाखल आहे.
होर्डिंग पडल्यानंतरचे धोकादायक दृश्य
सामान्य दिवसांप्रमाणेच घाटकोपर येथील पेट्रोल पंपावरही लोकांची गर्दी होती. पेट्रोल पंपावर उपस्थित असलेले सर्वजण आपापल्या वाहनात पेट्रोल भरण्यासाठी थांबले होते. पाऊस पडत होता आणि बाहेर जोरदार वारा वाहत होता. सगळं नॉर्मल वाटत होतं पण अचानक जे काही घडलं त्याची कोणी कल्पनाही केली नसेल. मोठ्या आवाजाने पेट्रोल पंपाजवळ लावलेले 250 टन वजनाचे होर्डिंग काही सेकंदातच पेट्रोल पंपाच्या वर पडले. हे होर्डिंग पडताच आजूबाजूच्या लोक किंचाळायला लागले.
हे वाचले का ?





