घाटकोपर घटनेनंतर अमेरिकेतून मुलाची मदतीसाठी आर्तहाक,’आई-वडिलांना शोधा’

Maharashtra मुंबईतील घाटकोपरमध्ये सोमवारी 13 मे रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे एका पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात अपघातातील मृत व्यक्तींच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत यात 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 75 जण जखमी झाले असून यातील 43 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 31 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
अशात अनेक लोक बेपत्ता असल्याचीही माहिती समोर येत आहे. असेच काहीसे मनोज चंसोरिया आणि त्यांची पत्नी या घटनेनंतर बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. यांचा एकुलता एक मुलगा अमेरिक राहतो, या घटनेनंतर त्याने वडील मनोज आणि आईच्या फोनवर अनेकदा कॉल केल्यानंतरही त्यांनी कॉल उचलला नसल्यामुळे मुलाने शेवट आपल्या मित्रांना कॉल करून त्यांची विचारपूस करण्यास सांगितली. यावेळी त्यांच्या मित्रांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर मनोज यांच्या मोबाईलचं लोकेशन तपासणीसाठी पाठवलं. त्यानंतर मनोज यांचे लोकेशन या घाटकोपरच्या पेट्रोल पंप दाखवल्यावर पोलीस या घटनास्थळी दाखल झाले.
मनोज हे मुंबई विमानतळावर एअर ट्राफिकचे पूर्व कंट्रोलचे जनरल मॅनजर (वय ६० वर्ष) म्हणून काम करत होते, ते सोमवारी (13 मे) संध्याकाळी अंधेरी पूर्व मरोळमधून आपल्या मध्यप्रदेशच्या जबलपूर या ठिकाणी गावी जाण्यासाठी मुंबईहून निघाले होते. ते टाटा हरिअर लाल कलरची गाडी घेऊन स्वतः चालवत आपल्या पत्नीसोबत जात होते. मनोज घाटकोपरला पोहोचल्यानंतर आपल्या गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आले होते. त्याचवेळी होर्डिंग कोसळले आणि त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा याठिकाणी ढिगाऱ्याखाली मृत्यू झाला. तर अजूनही पत्नी बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. मुलाचे मित्र आणि कुटूंब हे सर्व जण घटनास्थळी दाखल झाले असून मनोज आणि त्यांच्या पत्नीचा शोध घेत आहेत.
हे वाचाल का ? हिमाचलच्या कांगडा जिल्ह्यातील ‘या’ दुर्गम गावात फक्त 159 मतदार, पायी जाण्यासाठी लागतात 4 ‘दिवस’





