Crime News : मोटरसायकल चोरीप्रकरणी आरोपीस अटक; चोरीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल हस्तगत
Crime News : आरोपी तसेच हस्तगत केलेली मोटरसायकल पुढील कायदेशीर कारवाईसाठी शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली आहे.

कोरेगाव भीमा : शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या हिरो कंपनीच्या स्प्लेंडर प्लस मोटरसायकल चोरीप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असून, त्याच्याकडून चोरीची मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे. या कारवाईमुळे मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास पुढे नेण्यास पोलिसांना यश आले आहे.
शिक्रापूर पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी बिलिचदान जॉन्सन टोप्पो, रा. सराटेवस्ती, सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. झारखंड यास ताब्यात घेतले.पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेली हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल (क्रमांक एमएच २४ सीसी ९८३३) हस्तगत करण्यात आली.
आरोपी तसेच हस्तगत केलेली मोटरसायकल पुढील कायदेशीर कारवाईसाठी शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली आहे. सदर ची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहायक पोलीस फौजदार संजय पड्याळ, पोलीस हवालदार तुषार पंदारे, पोलीस हवालदार जनार्दन शेळके, पोलीस हवालदार संजू जाधव, पोलीस हवालदार विकास पाटील आणि पोलीस अंमलदार सागर धुमाळ यांनी सहभाग घेतला.





