खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयातील आरोपी स्वारगेट पोलिसांकडून जेरबंद

पुणे – खूनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याविरुध्द मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेजस रामलाल यादव वय (20, रा. मीनाताई ठाकरे वसाहत, मार्केटयार्ड) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार स्वारगेट पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घालत होते. तेव्हा पोलीस हवालदार सचिन कदम, पोलीस शिपाई ज्ञाना बडे व मनोज भोकरे यांना मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयातील आरोपी यादव हा गुलटेकडी येथील गणिबाबा दर्गा येथे येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची वैद्यकीय तपासणी करुन त्याला मार्केटयार्ड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक सुरेश जायभाय, विजय कुंभार, विजय खोमणे, संदीप साळवे, सोमनाथ कांबळे, ऋषिकेश तिथमे, लखन धावरे, सचिन दळवी, वैभव शीतकाळ ,अमित शिंदे, सचिन दळवी यांच्या पथकाने केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.