नाशिक, – नाशिक-पुणे महामार्गावर दत्त मंदिर सिग्नलजवळ आज सकाळी भीषण अपघात घडला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दत्त मंदिर सिग्नलजवळ सद्गुरू हॉटेलसमोर घडली. या धडकेत दुचाकीवरील पुरुष आणि महिलेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर वाहनचालक फरार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून वाहनचालकाचा पोलीस शोध घेत आहेत.