Electric Shock Death : काळजाचा थरकाप! शेळ्यांचा चारा तोडताना विजेचा धक्का; तरुणाचा जागीच मृत्यू
Electric Shock Death : शेळ्यांच्या चाऱ्यासाठी झाडावर चढणे बेतले जीवावर; झाडाच्या फांदीचा हायव्होल्टेज वायरला स्पर्श होताच तरूणाचा जागीच मृत्यू.
Updated On:

Electric Shock Death – किकवी (ता. भोर) येथे शेळीच्या चाऱ्यासाठी झाडावर चढलेल्या एका २३ वर्षीय तरुणाचा विजेचा तीव्र धक्का लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दि. १०) दुपारी घडली. गणेश रामय्या भंडारी (वय २३) असे मृत तरुणाचे नाव आहे. गणेश भंडारी हे शेळीपालन करून आपला उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी दुपारी शेळ्यांच्या चार्यासाठी ते झाडावर पाला तोडण्यासाठी चढले होते.
यावेळी झाडाची एक फांदी जवळूनच गेलेल्या महावितरणच्या उच्च दाबाच्या वीज वाहिनीला स्पर्श झाली. झाडातून विजेचा प्रवाह उतरल्याने गणेश यांना जोरदार धक्का लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांना कळविले. स्थानिक पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.





