तेलगी घोटाळा प्रकरणातील तपास अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू
Updated On:

मुंबई – भारतात सर्वात मोठा बनावट स्टँप पेपर (मुद्रांक शुल्क) घोटाळा प्रकरणाचा तपास अधिकारी राहिलेले सेवानिवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्त मोहम्मद जावेद (72) यांचा टॅक्सीच्या धडकेत अपघाती मृत्यू झाला आहे.
ज्या टॅक्सीच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला त्या टॅक्सीचालकाला अटक करण्यात आली आहे. केशव प्रसाद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मोहम्मद जावेद हे सहाय्यक पोलीस आयुक्त पदावरून सेवानिवृत्त झाले होते.
ते पत्नी मुलांसह माझगाव परिसरात राहत होते. नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास ते भाऊचा धक्का येथे फेरफटका मारण्यासाठी गेले असताना हा अपघात झाला.





