प्रसिद्ध गायक आनंद शिंदेंचा अपघात; थोडक्यात बचावले
Updated On:

सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला आज अपघात झाला. पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती असून सुदैवाने या अपघातातून ते थोडक्यात बचावले आहेत. पण त्यांचा चालक या अपघातात गंभीर जखमी झाला आहे.
माहितीनुसार, आनंद शिंदे यांचा मुलगा उत्कर्ष हा निवडणूक लढविण्याची तयारी करत आहे. यानिमित्ताने काल ते आपल्या गावी निघाले होते. रात्री दोनच्या सुमारास इंदापूरजवळ वरकुटे येथे त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातातून आनंद शिंदे थोडक्यात बचावले.





