Accident News : कर्नाटकच्या कलबुर्गी जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. चित्तपूर तालुक्यात कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात (Accident News) एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना राष्ट्रीय महामार्गावरील लाडलापूर गावाजवळ शुक्रवारी रात्री उशिरा घडली. मिळालेल्या माहितीनुसार, चित्तपूर तालुक्यातील इंगलागी गावातील हे कुटुंब आपल्या एका आजारी नातेवाईकाला पाहण्यासाठी यादगीर येथील रुग्णालयात गेले होते. रुग्णालयात नातेवाईकाच्या तब्येतीची विचारपूस करून, शुक्रवारी रात्री उशिरा हे सर्वजण कारने आपल्या गावी (इंगलागी) परतत होते. मात्र, गावी पोहोचण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने (Accident News) घाला घातला. हे कुटुंब कारमधून लाडलापूरजवळ राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना, समोरून येणाऱ्या एका वेगवान ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा चक्काचूर झाला आणि कारमधील पाचही जणांचा जागीच (Accident News) मृत्यू झाला. अपघातातील मृतांची नावे खालीलप्रमाणे : तोलुसाब केशव (वय २७ वर्ष) हुसेन शाह (वय ४८ वर्ष) मैबूब अली (वय ४५ वर्ष) रसूल बी (वय ४२ वर्ष) फातिमा अली (वय ३८ वर्ष) अपघाताचा आवाज इतका मोठा होता की, आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली आणि कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस दलही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह कारबाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी वाडी शासकीय रुग्णालयात पाठवले. Accident News पोलिसांचा तपास सुरू या घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही अपघातग्रस्त भागाची पाहणी केली आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. याप्रकरणी वाडी पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या भीषण अपघातामुळे इंगलागी गावावर आणि मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.