माळशेज घाटात भीषण अपघात ! टेम्पो आणि दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; चार जण ठार

Accident | Malshej Ghat | माळशेज घाटात दुधाची वाहतूक करणारा टँकर टेम्पोला धडकून नदीत कोसळल्याने झालेल्या अपघातात चार जण ठार झाले आहेत. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास कल्याण-नगर रस्त्यावरील बोरांडे गावाजवळ हा अपघात झाला, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
दुधाचा टँकर आणि भाजीपाला भरलेला टेम्पो आळेफाटा येथून कल्याणच्या दिशेने निघाला होता. टँकरने टेम्पोला धडक दिली त्यामुळे तो नदीत पडला. टँकरमध्ये प्रवास करणारे जोडपे, टँकरचा चालक आणि टेम्पोचा चालक असे चौघे जण या अपघातात ठार झाले, तर या जोडप्याचा चार वर्षांचा मुलगा मात्र वाचला आहे.
अक्षय दिघे (30), त्याची पत्नी तेजस (26) आणि टँकर चालक दत्तात्रय वामन (42) हे जागीच ठार झाले, तर टेम्पो चालक शकील शेख (29) यांचा काही वेळानंतर मृत्यू झाला, पोलिसांनी मृत टँकर चालकाविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





