नागपूरच्या कोराडी येथील महालक्ष्मी मंदिर परिसरात दुर्घटना; स्लॅब कोसळल्याने अनेक जण जखमी

Nagpur News | नागपूरमधील कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा देवस्थान परिसरात शनिवारी संध्याकाळी भीषण अपघात घडला. कोराडी मंदिराच्या मागील बाजूस खापरखेडा-कोराडी रोडवर सुरू असलेल्या महाद्वाराच्या बांधकामादरम्यान गेटचा एक भाग अचानक कोसळला. ज्यामुळे काही मजूर खाली दबल्याने एकच गोंधळ उडाला.यात १५ ते २० जण जखमी झाले आहेत.
मंदिराच्या मागील बाजूस ३० ते ३५ फुटांचे भव्य प्रवेशद्वार उभारले जात आहे. त्याचे काम सुरू आहे. अंदाजे ८०० चौरस मीटरच्या या स्लॅबचे कंत्राट बी. व्ही. जी. कंस्ट्रक्शन कंपनीला मिळाले आहे. शनिवारी या बांधकामाचा लोखंडी सांगाडा तयार करण्यात आला. त्यात सिमेंट आणि काँक्रिट भरले जाणार होते.
मात्र संध्याकाळी आठ ते सव्वा आठच्या सुमारास हा सांगाडाच खाली कोसळला. त्यावेळी १५ मजूर कामावर उपस्थित होते. स्लॅबचा हा लोखंडी सांगाडा अंगावर पडल्याने मजूर दबले गेले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मोठी जीवितहानी टळली
प्राथमिक माहितीनुसार, गेटच्या खांबांचे काँक्रीटिंग पूर्ण झाले होते, मात्र लोखंडी स्ट्रक्चर बसवण्याचे काम सुरू असताना हा अपघात झाला. कोसळण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही. दरम्यान, कोराडी हे नागपूर जिल्यातील एक धार्मिक स्थळ आहे, येथे मोठ्या संख्येने भाविक येतात. मात्र अपघाताच्या वेळी मंदिर परिसरात भाविकांची गर्दी नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. Nagpur News |
हेही वाचा :
Pune City | पत्रव्यवहार, प्रस्ताव आता फक्त ऑनलाईन ; शिक्षण विभागात ई-ऑफिस अनिवार्य





