शिक्रापूर, (वार्ताहर)- धामारी (ता. शिरुर) येथील एका अल्पवयीन युवतीची महाविद्यालयात ओळख झाल्यानंतर युवतीला लग्नाचे आमिष दाखवत युवतीवर अत्याचार केले. शिक्रापूर पोलीस स्टेशन सनी बाळासाहेब डफळ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. धामारी येथील पीडित अल्पवयीन युवती पाबळ येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तिची ओळख सनी डफळ याच्या सोबत झाली. त्यांनतर सनी याने युवतीशी ओळख वाढवून युवतीला लग्नाचे आमिष देऊन तिला वारंवार भेटू लागला. त्यांनतर सनी याने बळजबरीने युवतीवर अत्याचार केला. युवती वारंवार लग्नाबाबत विचारणा करत असताना आपण लवकरच लग्न करु असे आश्वासन देऊन सनी हा युवतीशी लग्न करण्यास टाळाटाळ करु लागला. युवतीने याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे करीत आहेत.