nagar | लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Updated On:

नगर, (प्रतिनिधी) – शहरात राहणार्या अल्पवयीन मुलीला एका तरूणाने लग्नाचे आमिष दाखवत फूस लावून छत्रपती संभाजीनगर रोडवरील इमामपूर घाटातील लाॅजवर नेवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उजेडात आली आहे.
याबाबत पिडीत मुलीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयीत आरोपी आदिनाथ लोंढे याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत मुलीची संशयीत आरोपी आरोपीसोबत ओळख झाली होती.
त्याने तिला फिर्यायला जाऊ असे म्हणत त्याने फिर्यादीला दुचाकीवर बसून इमामपूर घाटात नेले. व तेथे एका लाॅजवर नेवून लग्नाचे अमिष दाखवत अत्याचा केला. ही बाब पिडितेने कुटुंबियांना सांगितले. त्यानंतर पिडीतेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.





