pune nashik highway accident : फरार टेम्पो चालकाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; चाकण परिसरातून घेतले ताब्यात

पुणेः काल शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव परिसरात प्रवासी वाहतूक करणारे वाहन आणि टेम्पोचा भीषण अपघाताची घटना घडली होती. या अपघातामध्ये नऊ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाले होते. या अपघाताच्या घटनेनंतर टेम्पो चालक फरार झाला होता. या फरार टेम्पो चालकाला पोलिसांनी चाकण परिसरातून ताब्यात घेत अटक केली आहे.
नेमका अपघात कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नारायणगाव परिसरात प्रवासी वाहतूक करणारी मॅक्स अॅाटो गाडीला पाठीमागून आलेल्या आयशर टेम्पोने जोराची धडकी दिली. आयशरने मागून धडक दिल्यामुळे मॅक्स अॅाटो पुढे असलेल्या एसटी बसवरती फेकली गेली. यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये चार महिला, चार पुरुष आणि एका बाळ यांचा समावेश आहे.
या अपघाताच्या घटनेनंतर टेम्पो चालकाने घटनास्थळावरून पळ काढला होता. तो हरियाणा राज्यात पलायन करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. रोहित कुमार जगमालसिंग चौधरी असे या आयशर चालकाचे नाव आहे. या अपघातमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या मयतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींवर योग्य प्रकारे उपचार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचे त्यांनी एक्सवरून सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस पोस्ट
“पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात ९ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येईल. जखमींच्या उपचाराची योग्य काळजी घ्या, असे मी पुणे पोलिस अधीक्षक यांना सांगितले आहे”, अशी पोस्ट फडणवीस यांनी शेअर केली आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात 9 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो.
मृतांच्या…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 17, 2025





