South Korea : सिओलमध्ये भीषण आग; 60 हून अधिक घरे जळून खाक तर 500 लोक…

सिओल, – दक्षिण कोरियाची राजधानी सिओलमधील झोपडपट्टी भागातील गुर्योंग गावात आज सकाळी आग लागली. या भीषण आगीत 60 हून अधिक घरे जळून खाक झाली तर 500 लोकांना त्यांच्या घरातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र, या घटनेत किती जणांचा मृत्यू झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
अग्निशमन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, परिसरात आग लागताच लोकांमध्ये घबराट पसरली, लोक जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे धावताना दिसले.
अग्निशमन विभागाचे अधिकारी शिन योंग-हो यांनी सांगितले की, आग गावातील प्लॅस्टिकच्या पत्र्यांपासून बनवलेल्या घरात सुरू झाली होती, जी नंतर इतर घरांमध्ये पसरली. आगीचे नेमके कारण शोधले जात असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अनेक जण स्वत:हून सुरक्षित ठिकाणी पोहोचत आहेत.
“घटनेतील जीवित आणि मालमत्तेची हानी कमी करण्यासाठी सर्व उपलब्ध संसाधनांचा वापर करा,’ असे दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक-येओल यांचे प्रवक्ते किम उन-ही यांनी यावेळी सांगितल आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/air-india-urination-case-dgca-slaps-rs-30-lakh-penalty-on-ai-suspends-pilots-licence-for-3-months/
आगीचा व्हिडिओही व्हायरल
या आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आग विझवण्यासाठी 800 हून अधिक अग्निशमन दल तैनात करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय उंचीवरून पाणी शिंपडता यावे यासाठी 10 हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आले आहेत. आग इतकी भीषण होती की आजूबाजूला फक्त धुराचे लोट दिसत होते.







