Abishek Porel Century : बलात्काराच्या प्रकरणात ३६ दिवस तुरुंगात अन् मैदानात येताच शतक; खेळपट्टीवरच ढसाढसा रडला अभिषेक पोरेल!
Abishek Porel Century : अभिषेक पोरेलने रणजी करंडक २०२६-२७ च्या सलामीच्या सामन्यात थेट शतक ठोकत आपल्या टीकाकारांची बोलती बंद केली.

Abishek Porel Ranji Trophy Century Bengal vs Delhi Bail Controversy : बलात्कार आणि गुन्हेगारी धमकीच्या गंभीर आरोपांखाली तब्बल ३६ दिवस तुरुंगात घालवल्यानंतर जामिनावर बाहेर आलेल्या अभिषेक पोरेलने क्रिकेटच्या मैदानावर अभूतपूर्व आणि अत्यंत भावुक पुनरागमन केले आहे. कायदेशीर अडचणी, बदनामी आणि तुरुंगवासाचा अत्यंत कठीण टप्पा पार करून मैदानात उतरलेल्या पोरेलने रणजी करंडक २०२६-२७ च्या सलामीच्या सामन्यात थेट शतक ठोकत आपल्या टीकाकारांची बोलती बंद केली. शतक पूर्ण होताच भावनांचा बांध फुटल्याने तो खेळपट्टीवरच गुडघ्यावर बसून ढसाढसा रडताना दिसला.
३६ दिवसांनंतर जामीन अन् निवड समितीचा विश्वास –
गंभीर आरोपांखाली अटकेत असलेल्या पोरेलची नुकतीच न्यायालयाने जामिनावर सुटका केली होती. या वादानंतरही क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने त्याच्या गुणवत्तेवर विश्वास दाखवत सलामीच्या रणजी सामन्यासाठी संघात स्थान दिले. पोरेलने पहिल्याच दिवशी या विश्वासाचे चीज करत टीकाकारांना बॅटने चोख उत्तर दिले.
अवघ्या १३७ चेंडूंत शतक; सुदीप घरामीसोबत १९९ धावांची भागीदारी
एलिट ग्रुप क मधील सामन्यात दिल्लीचा पहिला डाव २४० धावांत आटोपल्यानंतर बंगालचा डाव सावरताना पोरेलने अप्रतिम खेळ दाखवला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने अवघ्या १३७ चेंडूंत ११ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा तो ११४ धावांवर नाबाद होता, तर चौथ्या विकेटसाठी सुदीप घरामीसह त्याने नाबाद १९९ धावांची मोठी भागीदारी रचली.
शतक झळकावल्यानंतर खेळपट्टीवरच झाला भावुक –
Abishek Porel nearly in tears after his fom against Delhi.
The young batter from Bengal has went through lots of off-field things and joined the camp just days before the match.
And he let his bat do the talking.
Congratulations, Abi ❤️
[Ranji Trophy, Bengal vs Delhi] https://t.co/qnc2gtUi6d
— Koushik Biswas (@kbofficial25) October 12, 2026
शतकी धाव पूर्ण करताच पोरेल अत्यंत भावुक झाला. गेल्या काही महिन्यांतील मानसिक तणाव, तुरुंगवास आणि समाजाच्या नजरांचा भार उतरल्यासारखा तो मैदानावरच खाली बसला आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. सहकाऱ्यांनी धाव घेत त्याला मिठी मारत धीर दिला.
दुलीप आणि इराणी कपनंतर थेट रणजीच्या मैदानात कमबॅक –
Abishek Porel struck an unbeaten 114 for Bengal against Delhi and broke down in tears. This century followed his release on bail weeks earlier in a case involving allegations of rape and criminal intimidation.
#RanjiTrophy | 📸: PTI https://t.co/u3jDcV4OkA
— Circle of Cricket (@circleofcricket) October 12, 2026
तुरुंगवासामुळे दुलीप ट्रॉफी आणि इराणी करंडकाला मुकावे लागल्यानंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे त्याचे दुसरे शतक ठरले. २०२६ च्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा भाग राहिलेल्या आणि बंगाल टी-२० लीगमध्ये कोलकाता टायगर्सकडून २७५ धावा कुटणाऱ्या पोरेलने जवळपास तीन महिन्यांनी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पाऊल ठेवत आपली उपयुक्तता पुन्हा सिद्ध केली.





