पुणे जिल्हा | गोरक्षनाथ टेकडीवर शनि देवास अभिषेक

मंचर, (प्रतिनिधी) – अवसरी फाटा (ता. आंबेगाव) येथे गोरक्षनाथ टेकडी स्थित शनी मंदिरामध्ये शनी जयंती निमित्त गुरुवारी (दि. 6) भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शेकडो भाविकांनी अन्नप्रसादाचा लाभ घेतला.
बाबा खेतानाथजी ट्रस्ट अध्यक्ष महंत योगी कृष्णनाथ जी महाराज यांच्या मार्गर्शनाखाली कार्यक्रमाचे व्यवस्थापन करण्यात आले होते. ट्रस्टचे खजिनदार किशोर अडवाणी, विश्वस्थ सुरेश भोर, पराग उद्योग समूहाचे सचिन शहा, ज्येष्ठ पत्रकार डी. के. वळसे पाटील, मिलिंद खुडे, मुकेश परिहार, प्रवीण नहार, दिनेश खुडे, शिवराज भोर, कुमार होनराव, भूषण थोरात, उमेश चक्कर या मान्यवरांच्या हस्ते शनी महाराज अभिषेक संपन्न झाला.
पौराहित्य रवींद्र त्रिवेदी, अमित सोमन यांनी केले. शनेश्वर ग्रूप, भवानी शर्मा आदी मान्यवरांनी अन्नदानासाठी योगदान दिले. याप्रसंगी शेकडो भाविकांनी अन्नप्रसाचा लाभ घेतला. योगी तुफान नाथजी, बापू निघोट, अनुप भोर यांनी संपूर्ण कार्यक्रमाची व्यवस्था पाहिली.





