IND vs AUS : अभिषेक शर्माने मोडला वर्ल्ड रेकॉर्ड! अवघ्या ५२८ चेंडूत ‘हा’ खास पराक्रम करणारा जगातील पहिलाच खेळाडू

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताकडून सलामीला आलेल्या अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल या जोडीने संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. अभिषेकने आपल्या खेळीतील 11 वी धाव पूर्ण करताच, त्याने हा ऐतिहासिक टप्पा गाठला.
सर्वात कमी चेंडूंमध्ये 1000 T20I धावा करणारे फलंदाज –
🚨 𝑴𝑰𝑳𝑬𝑺𝑻𝑶𝑵𝑬 🚨
Abhishek Sharma sets a new world record, becoming the fastest batter (by balls faced) to reach 1️⃣0️⃣0️⃣0️⃣ T20I runs! 🔥💪🏼
He completed this milestone in just 528 balls. #T20Is #AUSvIND #AbhishekSharma #Sportskeeda pic.twitter.com/hlU1WM5SlK
— Sportskeeda (@Sportskeeda) November 8, 2025
अभिषेक शर्माने केवळ 528 चेंडूंमध्ये आपल्या 1000 टी-20 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या आहेत. या बाबतीत त्याने ऑस्ट्रेलियाचा खेळाडू टिम डेव्हिडचा विक्रम मोडला. टिम डेव्हिडने 569 चेंडूंमध्ये हा आकडा गाठला होता. या शानदार विक्रमासह, अभिषेक शर्माने टी-20 क्रिकेटमधील आपली स्फोटक फलंदाजीची क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
1000 T20I धावा पूर्ण करण्यासाठी घेतलेले सर्वात कमी चेंडू –
- अभिषेक शर्मा (भारत) – 528 चेंडू
- टिम डेव्हिड (ऑस्ट्रेलिया) – 569 चेंडू
- सूर्यकुमार यादव (भारत) – 573 चेंडू
- फिल सॉल्ट (इंग्लंड) – 599 चेंडू
डावानुसार ठरला दुसरा सर्वात जलद भारतीय –
चेंडूंच्या बाबतीत विश्वविक्रम करण्यासोबतच, अभिषेक शर्मा सर्वात कमी डावांमध्ये 1000 टी20 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा दुसरा सर्वात जलद भारतीय खेळाडू देखील ठरला आहे. त्याने आपल्या 28 व्या डावात हा टप्पा गाठला. या यादीत भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे, ज्याने केवळ 27 डावांमध्ये 1000 धावांचा टप्पा पार केला होता.
हेही वाचा – Ravindra Jadeja : सीएसकेने जड्डूचा ‘तो’ VIDEO पोस्ट केल्याने उडाली खळबळ! नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या
वर्ष 2025 मध्ये अभिषेक शर्माचा फॉर्म खूपच उत्कृष्ट राहिला आहे, जिथे त्याने भारतीय संघाला सातत्याने जलद आणि दमदार सुरुवात देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याचा हा नवीन विश्वविक्रम भारतीय क्रिकेटप्रेमींना आनंद देणारा आहे.





