Abhishek Sharma Record : अभिषेक शर्माचा ऐतिहासिक धमाका! ख्रिस गेलच्या ‘त्या’ अवाढव्य क्लबमध्ये एन्ट्री मारणारा बनला पहिलाच भारतीय
Abhishek Sharma Record : अभिषेक शर्माच्या वादळी खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबाद संघाने आरसीबीसमोर २५५ धावांचा डोंगर उभारला.

Abhishek Sharma Sixes Record : सनरायझर्स हैदराबादचा स्टार सलामीवीर अभिषेक शर्माने शुक्रवारी (२२ मे) आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मैदानात पाऊल ठेवताच इतिहास रचला आहे. हैदराबादच्या या २५ वर्षीय डाव्या हाताच्या स्फोटक फलंदाजाने चिन्नास्वामी स्टेडियमवर चौकार-षटकारांचा असा पाऊस पाडला, ज्याने त्याला एका अत्यंत दुर्मिळ जागतिक विक्रमाचा मानकरी बनवले. दोन वेगवेगळ्या टी-२० टूर्नामेंट किंवा आयपीएल हंगामात ४० पेक्षा जास्त षटकार ठोकणारा अभिषेक जगातील पहिला भारतीय आणि ओव्हरऑल फक्त दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी क्रिकेटच्या इतिहासात केवळ ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेललाच असा पराक्रम करता आला होता.
२२ चेंडूंत ५६ धावा कुटत स्वतःचाच रेकॉर्ड मोडला!
आरसीबीविरुद्धच्या या हायव्होल्टेज सामन्यात अभिषेक शर्माने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. त्याने अवघ्या २२ चेंडूंत ५६ धावांची तुफानी खेळी साकारली. या खेळीदरम्यान त्याच्या बॅटमधून ४ चौकार आणि ५ गगनचुंबी षटकार निघाले. या ५ षटकारांच्या मदतीने अभिषेकने आयपीएल २०२६ च्या १४ सामन्यांमध्ये आपल्या एकूण षटकारांची संख्या ४३ वर पोहोचवली आहे. यासह त्याने आयपीएल २०२४ च्या हंगामात नोंदवलेला आपलाच ४२ षटकारांचा जुना विक्रम मोडीत काढला.
थेट ख्रिस गेलच्या ‘महाक्लब’मध्ये एन्ट्री!
Abhishek Sharma ने आरसीबी के खिलाफ 20 गेंदों में अर्धशतक बनाया,
और सबसे ज्यादा रन छक्कों से बनाए है ! 🔥✅#SRHvsRCB #RCBvsSRH pic.twitter.com/mCbPsZMxFL
— Amrita Yadav (@AmritaYada60221) May 22, 2026
अभिषेक शर्मापूर्वी जगातील कोणत्याही भारतीय फलंदाजाला दोन वेगवेगळ्या टी-२० स्पर्धेत ४० हून अधिक सिक्स मारता आले नव्हते. ख्रिस गेलने आरसीबीकडून खेळताना आयपीएल २०११ मध्ये ४१, २०१२ मध्ये ५९ आणि २०१३ मध्ये ५१ षटकार ठोकले होते. याशिवाय २०१७ च्या बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये रंगपूर रायडर्सकडून खेळताना त्याने ४७ षटकार मारले होते. आता या दिग्गजांच्या यादीत मानाचे स्थान मिळवणारा अभिषेक दुसरा क्रिकेटर ठरला आहे.
१५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीशी तगडी फाईट; गेलचा रेकॉर्ड धोक्यात!
Abhishek Sharma ने आरसीबी के खिलाफ 20 गेंदों में अर्धशतक बनाया,
और सबसे ज्यादा रन छक्कों से बनाए है ! 🔥✅#SRHvsRCB #RCBvsSRH pic.twitter.com/mCbPsZMxFL
— Amrita Yadav (@AmritaYada60221) May 22, 2026
एकाच आयपीएल हंगामात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अभिषेक सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्सचा वैभव सूर्यवंशी आहे. बिहारच्या या डाव्या हाताच्या फलंदाजाने आयपीएल २०२६ च्या अवघ्या १३ सामन्यांत तब्बल ५३ षटकार ठोकले आहेत. २४ मे रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध वानखेडेवर होणाऱ्या सामन्यात वैभवने आणखी ७ षटकार मारले, तर तो ख्रिस गेलच्या एका हंगामातील सर्वाधिक ५९ षटकारांचा ऑल-टाईम वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त करेल. त्यामुळे आता संपूर्ण देशाचे लक्ष वैभवच्या कामगिरीकडे लागले आहे.





