Rohit Sharma Fitness : रोहितच्या फिटनेस मंत्राबद्दल अभिषेक नायरचा खुलासा; म्हणाला, ‘७०० रेप्स ते क्रॉस फिट…’, पाहा VIDEO

Abhishek Nayar revealed about Rohit Sharma Fitness : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘हिटमॅन’ म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा गेल्या सात महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर होता. मात्र, या काळात तो आपल्या फलंदाजीपेक्षा फिटनेसमुळे चर्चेत राहिला. नेहमीच फिटनेसवरून ट्रोल होणाऱ्या रोहितने प्रचंड मेहनत घेत ११ किलो वजन कमी करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पुनरागमन करताना त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही. रोहित केवळ ८ धावा करून झेलबाद झाला. तरीही, त्याच्या फिटनेस प्रवासाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
रोहितने भारतीय संघातून बाहेर असताना माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरसोबत आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केले. जिममधील व्यायाम असो वा नेट्समधील फलंदाजीचा सराव, अभिषेक नायरने रोहितला प्रत्येक पावलावर साथ दिली. वजन कमी केल्यानंतर नायरने रोहितसोबतचा जिममधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्याने चाहत्यांचे लक्ष वेधले.
रोहितच्या फिटनेस प्रवासाबद्दल अभिषेक नायरचा खुलासा –
10 kilos down, 800 reps strong! 💪#AbhishekNayar breaks down @ImRo45‘s fitness journey – the hard work, the discipline, and the transformation behind the Hitman’s return. 🔥#AUSvIND 👉 1st ODI | LIVE NOW 👉 https://t.co/FkZ5L4CrRl pic.twitter.com/UKfDWdFUBN
— Star Sports (@StarSportsIndia) October 19, 2025
जिओस्टारवर बोलताना अभिषेक नायरने रोहितच्या फिटनेस प्रवासाबाबत सविस्तर माहिती दिली. तो म्हणाला, “रोहितने दररोज तीन तास प्रशिक्षण घेतले. आम्ही कार्डीओवर जास्त भर दिला नाही. सुरुवातीच्या पाच आठवड्यांमध्ये रोहितची मानसिकता एखाद्या बॉडीबिल्डरसारखी होती. त्याला फक्त वजन कमी करायचे होते. त्याने जास्त रेपिटेशन्ससह बॉडीबिल्डरप्रमाणे प्रशिक्षण घेतले.”
नायर पुढे म्हणाला, “रोहित शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी ७०० ते ८०० रेपिटेशन्स पूर्ण करत होता. उदाहरणार्थ, छाती आणि ट्रायसेप्सच्या व्यायामासाठी तो ७०० ते ८०० रेपिटेशन्स करायचा. प्रत्येक सत्राचा शेवट १५ ते २० मिनिटांच्या क्रॉस फिटने व्हायचा, जो कार्डीओचा एक भाग होता.” हे प्रशिक्षण आठवड्यातून सहा दिवस, प्रत्येकी तीन तास असे सुरू होते.
हेही वाचा – IND vs AUS : विराट फक्त धावाच करण्यात नव्हे तर डकमध्ये सर्वात पुढे! आता ‘या’ लज्जास्पद यादीत झाला सामील
ट्रोलर्सना रोहितचे प्रत्युत्तर –
Lean. Mean. Run-scoring machine 🦾#AbhishekNayar talks about how Hitman, @ImRo45, used 12 weeks of intense training to make a difference and become a fitter version of himself 💪⚔️#AUSvIND 👉 1st ODI | SUN, 19th OCT, 8 AM! pic.twitter.com/dTijpgw6zJ
— Star Sports (@StarSportsIndia) October 17, 2025
रोहितचा ‘हिटमॅन’ ते ‘फिटमॅन’ बनण्याचा प्रवास सोपा नव्हता. प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्याने आपले वजन ११ किलोने कमी केले आणि फिटनेसवरून ट्रोल करणाऱ्यांना सणसणीत उत्तर दिले. अभिषेक नायरच्या मार्गदर्शनाखाली रोहितने आपली मानसिक आणि शारीरिक ताकद दाखवून दिली. त्याच्या या परिवर्तनाने चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण केला असून, तो पुन्हा एकदा मैदानावर आपल्या फलंदाजीने कमाल करेल, अशी आशा आहे.





