कोलकता हत्याकांडप्रकरणी अभिषेक बॅनर्जी यांनी सोडले मौन; ममतांना दिला सल्ला

Abhishek Banerjee | कोलकाता येथील आर जी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयातील बलात्कार आणि हत्या प्रकरणी प. बंगालमधील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. असे असतानाच ममता बॅनर्जी यांच्याच पक्षातील दुसऱ्या क्रमाकांचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी ममता यांच्या सरकारला सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर सल्ला दिला आहे.
तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी कोलकाता येथील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात मौन तोडले आहे. अभिषेक बॅनर्जी यांनी बलात्काराच्या प्रकरणांबाबत कठोर कायदा आणण्याची मागणी केली. तसेच बलात्कार करणाऱ्या नराधमांवर त्वरीत खटला चालवण्याचे आवाहन त्यांनी सरकारकडे केले.
याचवेळी भारतीय जनता पार्टीकडून होत असलेल्या आरोपांनाही त्यांनी थेट उत्तर दिले असून अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी देशात कठोर कायदा केला जाण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बलात्कार आणि हत्येच्या अशा गुन्ह्यांमध्ये ५० दिवसांच्या आत दोषसिध्दी होऊन कठोर शिक्षा झाली पाहिजे असे अभिषेक बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये ते पुढे म्हणतात की, कोलकाता येथे घडलेल्या घटनेवरून गेल्या दहा दिवसांपासून देशात निदर्शने आणि निषेध सुरू आहे. लोक न्यायाची मागणी करत आहेत. या काळात देशाच्या वेगवेगळ्या भागांत अत्याचाराच्या ९०० पेक्षा अधिक घटना घडल्या आहेत. Abhishek Banerjee |
Over the past 10 days, while the nation has been protesting against the #RGKarMedicalcollege incident and demanding justice, 900 RAPES have occurred across different parts of India – DURING THE VERY TIME WHEN PEOPLE WERE ON THE STREETS PROTESTING AGAINST THIS HORRIBLE CRIME.…
— Abhishek Banerjee (@abhishekaitc) August 22, 2024
रोज ९० नव्या घटना समोर येत आहेत याचा अर्थ दर पंधरा मिनिटांनी एक घटना घडत आहे. मात्र या समस्येवर कायमचा तोडगा काढला पाहिजे. ५० दिवसांच्या आत आरोपींवर दोष सिध्द करून त्याला शिक्षा दिली जाणाऱ्या कठोर कायद्याची आपल्याला गरज आहे. राज्य सरकारांनी कारवाई केली पाहिजे आणि कायदा करण्यासाठी त्यांनी केंद्र सरकारवर दबाव टाकला पाहिजे. त्यापेक्षा कोणतीही कमतरता असलेली कृती प्रभावहीन असेल आणि भारताने आता जागे होण्याची गरज आहे. Abhishek Banerjee |
काय आहे नेमकं प्रकरण?
9 ऑगस्ट रोजी सकाळी रुग्णालयाच्या सभागृहात महिला डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी आरोपीला 10 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर शेकडो डॉक्टर संपावर असून सुरक्षेची मागणी केली जात आहे. या घटनेवरून ममता सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आहे.
हेही वाचा:
राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी 3’ची घोषणा; पुन्हा दिसणार शिवानी रॉयच्या भूमिकेत





