Abhishek Bachchan: ‘किंग’साठी अभिषेक बच्चनचा दमदार नवा अवतार; शाहरुखसमोर साकारणार खलनायकाची भूमिका?
अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांनी या चित्रपटासाठी पूर्णपणे नवा लुक स्वीकारला आहे. अलीकडेच ग्लोबल बिझनेस समिट 2026 दरम्यान त्यांनी स्वतः याची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, सध्या ते ‘किंग’चे शूटिंग करत असून त्यासाठीच त्यांनी हेअरस्टाइल आणि व्यक्तिमत्त्वात बदल केला आहे. मात्र, त्यांनी आपल्या भूमिकेबद्दल अधिक माहिती देणे टाळले.

Abhishek Bachchan: सुपरस्टार शाहरुख खान यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट किंग सध्या जोरदार चर्चेत आहे. अॅक्शन-थ्रिलर शैलीतील या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या चित्रपटात अनेक मोठे कलाकार एकत्र दिसणार असल्याची चर्चा असून, आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
अभिनेता अभिषेक बच्चन यांनी या चित्रपटासाठी पूर्णपणे नवा लुक स्वीकारला आहे. अलीकडेच ग्लोबल बिझनेस समिट 2026 दरम्यान त्यांनी स्वतः याची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, सध्या ते ‘किंग’चे शूटिंग करत असून त्यासाठीच त्यांनी हेअरस्टाइल आणि व्यक्तिमत्त्वात बदल केला आहे. मात्र, त्यांनी आपल्या भूमिकेबद्दल अधिक माहिती देणे टाळले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) खलनायकाच्या भूमिकेत दिसू शकतात. जर ही बातमी खरी ठरली, तर प्रेक्षकांना अभिषेकचा एक वेगळाच अवतार पाहायला मिळणार आहे. यापूर्वीही त्यांनी नकारात्मक छटांच्या भूमिका साकारल्या आहेत, पण ‘किंग’मधील त्यांची भूमिका अधिक प्रभावी आणि दमदार असणार असल्याचे म्हटले जाते.

Abhishek Bachchan
या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. चित्रपटात शाहरुख खानसोबत सुहाना खानही दिसणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय दीपिका पदुकोण, अनिल कपूर, राणी मुखर्जी, अरशद वारसी, जयदीप अहलावत, राघव जुयाल, सौरभ शुक्ला आणि जॅकी श्रॉफ यांसारखी मोठी नावेही या प्रोजेक्टशी जोडली जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, अद्याप अधिकृत स्टारकास्ट जाहीर झालेली नाही.
‘किंग’ हा चित्रपट 24 डिसेंबर 2026 रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येत्या काळात या चित्रपटाबाबत आणखी अनेक अपडेट्स समोर येण्याची शक्यता आहे. सध्या तरी अभिषेक बच्चनच्या नव्या लुकमुळे आणि त्यांच्या संभाव्य खलनायकाच्या भूमिकेमुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.





