“खतरों के खिलाडी 11′ या रिऍलिटी शोची चाहते उत्सुकतेने वाट पाहात आहेत. सध्या या शोचे शूटिंग केपटाऊनमध्ये सुरू आहे. अनेक टीव्ही सेलेब्स शोमध्ये जबरदस्त स्टंट करताना दिसत आहेत. रिपोर्टनुसार निक्की तांबोळी शोमधून बाहेर पडली आहे.
तर या यादीमध्ये आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे. त म्हणजे “बिग बॉस 14′ फेम अभिनव शुक्ला याचीही शोमधून एक्झिट झाली असल्याचे समजते. अभिनव शुक्लाने शोमध्ये टॉप-5मध्ये स्थान मिळवले होते.
आता मात्र अभिनव टॉप 4 मध्ये त्याला वगळण्यात आले आहे. अभिनव शोमधून बाहेर पडण्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण तो एकदम फिट आणि शोचा विजेता असल्याचे मानले जात होते. काही दिवसांपूर्वी अभिनव भयंकर स्टंट करत होता. मात्र, अद्याप त्याचा निकाल कोणालाही कळू शकलेला नाही.
या शोमधून अभिनव शोमधून बाहेर पडल्याने टॉप-4 मध्ये राहुल वैद्य, दिव्यांका त्रिपाठी, वरुण सूद आणि अर्जुन बिजलानी यांना स्थान मिळाले आहे. तसेच एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
ज्यात अर्जुन बिजलानी विद्युत शॉकमुळे रडकलेला दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अर्जुन इलेक्ट्रिक टॉवरवर स्टंट करताना दिसत आहे. अशावेळी चुकीच्या वायरला स्पर्श केल्यामुळे अर्जुन इलेक्ट्रोक्युट झाला.
व्हिडिओ शेअर करताना, चॅनेलने लिहिले की, “डेअरडेव्हिल बनण्याच्या मार्गावर आहेत इलेक्ट्रिक शॉक. खतरों के खिलाडी घेऊन येत आहे, अमर्याद भय आणि करमणूक. लवकरच.’