अभिजीत सावंतचे चाहत्यांना सरप्राइज; खास गाणं घेऊन येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Abhijeet Sawant | बिग बॉस मराठी सीझन 5 चा फर्स्ट रनरअप गायक अभिजीत सावंतने चाहत्यांना सरप्राइज दिले आहे. आज अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर अभिजीतने एक खास गाणं प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार असल्याचे सांगितले.
‘चाल तुरु तुरु’ या जुन्या गाण्याचं खास नवं व्हर्जन अभिजीत करणार आहे. येत्या 2 मे 2025 रोजी हे खास गाणं रिलीज होणार असून मूळ गाण्याचं काहीतरी हटके ट्वीस्ट असलेलं हे नवं गाणं असल्याची माहिती समोर येत आहे. प्रेक्षक कायम अभिजीतच्या नव्या कलाकृतींची वाट बघत असतात आणि अशातच हे नवं गाणं प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज आहे. Abhijeet Sawant |
View this post on Instagram
दुसरीकडे, 2025 हे वर्ष अभिजीत सावंतसाठी अजून एका कारणाने खास असून संगीत विश्वातील अभिजीतच हे २० वर्ष आहे. या निमित्ताने अभिजीतने ‘चाल तुरु तुरु’ गाणं प्रेक्षकांना भेट दिल्याचे म्हणता येईल. Abhijeet Sawant |
अभिजीतच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं तर, फर्स्ट इंडियन आयडॉलचा किताब अभिजीत सावंत याने जिंकला. त्यानंतर ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा फर्स्ट रनरअप होऊन तो पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात आला. अलीकडेच अभिजीतनं सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये हजेरी लावली होती. आता त्याचे नवं गाणंही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. Abhijeet Sawant |
हेही वाचा:
“पंतप्रधान मोदींना आमचं पूर्ण सहकार्य, धर्म, जातपात, भाषा…”; शरद पवारांची प्रतिक्रिया





