“पंतप्रधान मोदींना आमचं पूर्ण सहकार्य, धर्म, जातपात, भाषा…”; शरद पवारांची प्रतिक्रिया

Sharad Pawar on Pahalgam Attack | आमदार जितेंद्र आव्हाडांनी पुढाकार घेत अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ठाण्यात प्रति तुळजाभवानी मंदिर उभारण्यात आले. आज या तुळजाभवानी मंदिरात प्राणप्रतिष्ठापनाचा सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार शरद पवार, पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
पूजेनंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्याबाबत भाष्य केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमचं पूर्ण सहकार्य असेल, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
‘पहलगामवरचा हल्ला हा देशावरचा हल्ला’
“पहलगामवरचा हल्ला हा देशावरचा हल्ला आहे, यामध्ये ज्यांचे कुटुंबीय शहीद झाले, त्यांनी या देशासाठी किंमत दिली, इथे धर्म, जातपात, भाषा या गोष्टी आणायच्या नाहीत. आज भारतीयांवर हल्ला कुठल्या शक्तींचा होत असेल तर देशवासीय म्हणून कशाचीही अपेक्षा न करता आपल्याला एकत्र यावं लागेल. देशाचे पंतप्रधान आणि अन्य सहकारी याबाबत जी काही उपाययोजना करत असतील त्याला आमचं पूर्ण सहकार्य आहे,” असं शरद पवारांनी सांगितले. Sharad Pawar on Pahalgam Attack |
‘राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र आले तर चांगलंच’
यावेळी शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवरही प्रतिक्रिया दिली आहे. ‘दोघे एकत्र येत असतील तर चांगलंच आहे. मात्र यासंबंधीचं भाष्य करण्याचा आजचा प्रसंग नाही,’ असे म्हणत त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले. Sharad Pawar on Pahalgam Attack |
कृष्णशिळेतून साकारले मंदिर
दरम्यान, तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे, शक्तीपीठाचे एक रुप ठाण्यात साकारण्यात आले आहे. काळ्या पाषाणातून म्हणजेच कृष्णशिळेतून हे मंदिर साकारले आहे. आज शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते देवीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. Sharad Pawar on Pahalgam Attack |
हेही वाचा:
पाकिस्तानची आर्थिक कोंडी ! भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद केल्याने करोडोंचे नुकसान





