काँग्रेसच्या शेवगाव विधानसभा निरीक्षकपदी अभिजीत लुणिया यांची नियुक्ती

नेवासा – महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मान्यतेने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील विधानसभेच्या 252 मतदारसंघासाठी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
222 शेवगाव विधानसभा मतदार संघाच्या निरिक्षकपदी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष अभिजीत लुणिया यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे.
या निवडीबद्दल अभिजीत लुणिया यांचे महाराष्ट्राचे माजी महसुल मंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात, आ.लहुजी कानडे, माजी आ. डॉ सुधीर तांबे, आ.सत्यजीत तांबे, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आ.वजाहत मिर्झा, काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, समन्वयक ज्ञानदेव वाफारे, काँग्रेस अनुसूचित विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते यांनी अभिनंदन केले आहे.





