Abdulla Shahid Arrest : मालदीवचे माजी परराष्ट्र मंत्री अब्दुल्लाह शाहिद यांना अटक
मालदीवचे माजी परराष्ट्रमंत्री अब्दुल्लाह शाहिद यांना (Abdulla Shahid Arrest) बालकांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

Abdulla Shahid Arrest : मालदीवचे माजी परराष्ट्रमंत्री अब्दुल्लाह शाहिद यांना (Abdulla Shahid Arrest) बालकांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. शाहिद यांच्याविरोधात न्यायालयाच्या वॉरंटच्या आधारे सोमवारी हुलहूमाले येथील रेंबो ओशन फ्रंट येथील निवासस्थानातून अटक करण्यात आली.
किशोरवयीन व्यक्तीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली त्यांना अटक झाल्याचे मालदीव पोलिसांच्या निवेदनात म्हटले आहे. शाहिद (Abdulla Shahid Arrest) यांच्यावरील आरोपांचा तपास सुरू आहे, असे पोलिसांनी म्हटले असले, तरी या संदर्भातील अधिक तपशील प्रसिद्ध केला गेलेला नाही. आपल्याविरोधात बदनामीकारक दावे केले गेले असून हे सर्व दावे खोटे आहेत.
नागरिकांनी या बिनबुडाच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन शाहिद यांनी अटकेच्या काही वेळ आगोदर सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये केले आहे. २०२८ मध्ये अध्यक्षीय निवडणुक लढवण्यासाठी शाहिद मालदीव डेमोक्रॅटिक पार्टीचे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतानाच त्यांना अटक झाली आहे.
शाहिद (Abdulla Shahid Arrest) हे पहिल्यांदा २००७ ते २००८ या काळात अध्यक्ष मौमून अब्दुल गयूम यांच्या सरकारमध्ये आणि २०१८ ते २०२३ दरम्यान इब्राहिम मोहमद सोलिह यांच्या सरकारमध्ये दुसऱ्यांदा मालदीवचे परराष्ट्र मंत्री राहिले होते. त्यांनी २००९ ते २०१४ पर्यंत पीपल्स मजलिसचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आणि जून २०२१ मध्ये त्यांची संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७६ व्या सत्राचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.






