Nia Sharma : निया शर्माने शेअर केले मालदीवमधील फोटो; ‘या’ व्यक्तीसोबत रंगल्या डेटिंगच्या चर्चा
Nia Sharma : मालदिवमध्ये निया शर्मा आणि सिकंदर सिंग एकत्र

Nia Sharma : टीव्ही अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र आता निया तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती मालदीवमध्ये दिसली.
विशेष म्हणजे तिच्यासोबत सिकंदर सिंग देखील दिसत आहे. या दोघांच्या एकत्र असलेल्या फोटोंमुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले आहे. निया शर्माचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. (Nia Sharma)
निया शर्माने मालदीवचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. काही फोटोंमध्ये ती मोनोकिनी घालून बीचवर चिल करताना दिसत आहे. तर एका फोटोमध्ये निया शर्मा आणि सिकंदर सिंग एकत्र दिसले. दोघांनी मालदीवमध्ये एकत्र सायकलिंगही केली. तसेच, शेवटच्या फोटोमध्ये निया आणि सिकंदर एकमेकांना पकडून पोज देताना दिसले.
View this post on Instagram
नियाचे हे फोटो पाहून लोकांनी त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू केल्या आहेत. काहींनी या फोटोवर कमेंट करत ‘दोघे एकत्र खूप छान दिसत आहात,’ असे म्हंटले आहे. दरम्यान, या विषयावर निया शर्माने अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
कोण आहे सिकंदर सिंग? (Nia Sharma)
सिकंदर सिंग हा एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि पर्सनॅलिटी आहे. मनोरंजन विश्वात त्याचे चांगले कनेक्शन असल्याचे म्हटले जाते. तसेच तो ‘फित्ते मुंह’ नावाचा एक पॉडकास्ट चालवतो. निया शर्मा आणि सिकंदर सिंग एकत्र दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही ते अनेकदा एकत्र दिसले आहेत.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, नियाने मनोरंजन विश्वात अनेक हिट मालिका दिल्या आहेत. निया शर्मा अलीकडेच ‘लाफ्टर शेफ्स सीझन ३’ मध्ये दिसली होती. या कुकिंग रिॲलिटी शोमध्ये तिची जोडी कॉमेडियन सुदेश लहरीसोबत होती. हा शो आता संपला असून त्याचे विजेतेपद अली गोनी आणि जन्नत जुबेर यांनी पटकावले आहे. Nia Sharma
हेही वाचा:





