‘आशिकी’ चित्रपटातील अभिनेत्री सिनेसृष्टीत करणार कमबॅक? म्हणाली…

‘Aashiqui’ Fame Anu Aggarwal | बॉलिवूड अभिनेत्री अनु अग्रवालने 90च्या दशकात ‘आशिकी’ या चित्रपटामुळे मोठी लोकप्रियता मिळवली होती. तिचा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. पण एका अपघाताने तिचे आयुष्य बदलले आणि ती फिल्मी जगापासून पूर्णपणे दूर राहिली. पण आता अनुला बॉलिवूडमध्ये पुन्हा काम करायचे आहे. सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात ती बॉलीवूडमध्ये कमबॅक करण्याविषयी बोलताना दिसते.
भीषण अपघातानंतर जवळपास 3 महिने तिच्यावर उपचार सुरू होते. त्यातून अभिनेत्री सुदैवाने बचावली. पण, त्या अपघातामुळे तिचा चेहरा पूर्णपणे बिघडला. या सर्व प्रकारामुळे अभिनेत्री प्रचंड नाराज झाली आणि तिने इंडस्ट्रीपासून दूर राहणं पसंत केलं. आता लवकरच ही अभिनेत्री चाहत्यांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. 30 वर्षांनंतर अनु अग्रवालने सिनेइंडस्ट्रीत कमबॅक करणाऱ्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘Aashiqui’ Fame Anu Aggarwal |
एका मुलाखतीत ती म्हणाली की, ‘मी बराच काळ सिनेइंडस्ट्रीपासून लांब आहे. आता जवळपास 30 वर्ष मी सिनेसृष्टीपासून अंतर ठेवून आहे. मी सर्व दिग्दर्शक आणि निर्मात्यांना सांगू इच्छिते, की मला काम द्या. तुम्ही मला सोशल मीडियाच्या आधारेही संपर्क करू शकता. तसेच मी चित्रपट तसेच ओटीटीवर काम करायला तयार आहे’, अशीही मागणी तिने केली. अनु अग्रवाल आता सोशल मीडियावर सक्रिय असते.
दरम्यान, ‘आशिकी’ हा चित्रपट 1990 साली रुपेरी पडद्यावर रिलीज झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केले होते. यात राहुल रॉय, अनु अग्रवाल आणि दीपक तिजोरीने मुख्य भूमिका साकारली होती. ‘Aashiqui’ Fame Anu Aggarwal |
हेही वाचा:
अनुप्रिया पटेल भाजपसाठी डोकेदुखी? ; ‘त्या’ वक्तव्याने भाजपसाठी नवे आव्हान निर्माण?





