शेफाली जरीवालाच्या निधनानंतर आरती सिंगची भावूक पोस्ट

Aarti Singh | अभिनेत्री शेफाली जरीवाला ‘कांटा लगा’ या गाण्यातून मोठी प्रसिद्धी मिळाली. मात्र 27 जून रोजी रात्री उशीरा वयाच्या 42 व्या वर्षी तिचे निधन झाले. तिच्या अचानक जाण्याने कुटुंबासह चाहत्यांना धक्का बसला. ‘बिग बॉस 13’ मधली शेफालीची खास मैत्रीण आरती सिंगने देखील एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
आरती सिंगने लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती शेफाली जरीवाला आणि इतरांसोबत दिसत आहे. शिवाय तिने बिग बॉस 13 मधला एक गोड क्षण शेअर केला, ज्यामध्ये शेफाली आरतीचं कौतुक करत आहे.
आरतीने पोस्टमध्ये लिहिले आहे, ‘काल तुला पाहिल्याशिवाय मला विश्वास बसत नव्हता. मला अजूनही विश्वास बसत नाही. आपण एका आठवड्यापूर्वीच जिममध्ये भेटलो होतो आणि तू म्हणालेलीस की आरती तुझ्यासाठी खूप आनंद वाटतो. तू आनंदी आहेस ना? आपण एकत्र कार्डिओ करू. आम्ही हा प्लॅन एका आठवड्यापूर्वी केला होता. जेव्हा जेव्हा कोणी विचारायचं की बिग बॉसमधील कोणाकोणाशी तू अजून पण बोलतेस, कोणाशी अजूनपण तुझी मैत्री आहे. तेव्हा मी शेफू असे म्हणायचे.’
View this post on Instagram
आरतीने पुढे लिहिले आहे की, ‘मी माझ्या सर्वात वाईट स्वप्नातही कल्पना करू शकत नाही की तू निघून जाशील. तू वेडी होतीस. तू खूप आनंदी होतीस. तू नेहमीच मला प्रेम आणि आशीर्वाद दिले आहेस. तू कधीही कोणाबद्दल बोलली नाहीस किंवा गप्पा मारल्या नाहीत. तुझे हृदय स्वच्छ होते. का का का… देवाने असे का केले आहे. मी तुझ्यावर प्रेम करते आणि नेहमीच तुझ्यावर प्रेम करेन. मी नेहमीच तुझ्या सौंदर्याने प्रभावित होते. जेव्हा तू बिग बॉसमध्ये आलीस तेव्हा मी तुझ्यावरून माझे डोळे हटवू शकले नाही. लग्नाआधी तू मला दररोज बहिणीप्रमाणे फोन करून फेशियल कर अशी आठवण करुन देत होतीस. ‘
आरती सिंहने शेफालीच्या कुटुंबाचाही उल्लेख केला. तिने लिहिले, ‘मला काका आणि काकूंची काळजी वाटते. त्यांना असे पाहून माझे मन तळमळतं. पराग भैय्याने तुला कसे मुलासारखे ठेवले आणि तुझे लाड केले हे मी पाहिले आहे. आपण रडू, शोक करू, पण पुढे जाऊ, पण तुझे कुटुंब आयुष्यभर हे दुःख सहन करेल. मी असे म्हणू इच्छित नाही की तू स्वर्गात किंवा एखाद्या चांगल्या ठिकाणी जा. कारण ही वेळ तुझ्यासाठी जाण्याची नव्हती. तू नेहमीच माझी खास मैत्रीण राहशील. मी प्रार्थना करते की तू आनंदी राहा आणि तुझ्या कुटुंबाला धैर्य मिळो. माझी शेफू’, असे तिने पोस्टमध्ये लिहिले आहे.
दरम्यान, शेफालीने २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या कांटा लगा या आयकॉनिक म्युझिक व्हिडिओने तिचा ठसा उमटवला. या गाण्याच्या यशामुळे देशात रीमिक्स संगीताचे एक नवे युग सुरू झाले. शेफालीने यानंतर अनेक टीव्ही मालिकांमध्ये आणि प्रोजेक्ट्समध्येही काम केले. तिथे तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. तिने वाइल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे बिग बॉस सीझन १३ मध्ये भाग घेतला. याशिवाय शेफालीने ‘नच बलिये सीझन ५’ मध्येही भाग घेतला.
हेही वाचा:





