‘आपका अपना झाकीर’ शो एका महिन्यातच होणार बंद; कारण आले समोर

Aapka Apna Zakir Show| स्टँडअप कॉमेडियन झाकीर खानचा जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. महिनाभरापूर्वी झाकीर खानच्या ‘आपका अपना झाकीर’ या नव्या शोची घोषणा झाली. त्यानुसार सोनी टीव्हीवर त्याचा ‘आपका अपना झाकीर’ हा शो सुरू झाला होता. मात्र एका महिन्यातच हा शो बंद होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
‘आपका अपना झाकीर’ 10 ऑगस्ट रोजी सोनी टीव्ही वाहिनीवर प्रसारित झाला होता, परंतु आता एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत, निर्मात्यांनी ते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे झाकीर खानलाच नव्हे तर त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. टिआरपी आणि रेटिंग नसल्याने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. शोमध्ये बरेच मोठे स्टार्स येत होते, परंतु क्रिएटिव्ह लेव्हलवर काही इंटरेस्टिंग किंवा स्पेशल नव्हते, त्यामुळेच शोचे रेटिंग झपाट्याने घसरले आणि आता ते मॅनेज करणेही कठीण होत आहे. Aapka Apna Zakir Show|
‘आपका अपना झाकीर’ शोचे ६ एपिसोड शूट केले होते आणि हे सगळे एपिसोड प्रसारित करण्यात आले आहेत. त्यानंतर या शोचे एपिसोड शूट झाले की नाही याबाबत काहीच माहिती नाही. पण, रेटिंग चांगलं मिळत नसल्याने आणि टीआरपीच्या शर्यतीतून बाहेर पडल्याने हा शो बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Aapka Apna Zakir Show|
निर्मात्यांनी झाकीर खानला देखील याबद्दल माहिती दिली असल्याचे म्हंटले जात आहे. दुसऱ्या आठवड्यातच झाकीर खानच्या शोचे रेटिंग मर्यादेपलीकडे गेले. त्यामुळे आता ‘आपका अपना झाकीर’ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा :
‘या’ देशात कोणालाच एकमेकांशी काही देणेघेणे नाही; सुमारे 40 हजार लोकांचा घरात एकट्याने मृत्यू





