हरियाणा विधानसभेसाठी ‘आप’ची 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

चंदीगड – हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससोबत युती करण्याच्या चर्चेदरम्यान, आपने आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. जाहीर झालेल्या पहिल्या यादीत एकूण 20 उमेदवारांची नावे आहेत. आम आदमी पार्टीने रोहतकमधून बिजेंदर हुडा यांना उमेदवारी दिली आहे. हरियाणामध्ये आप आणि काँग्रेस युती करून एकत्र निवडणूक लढवण्याचा विचार करत आहेत. पण कोणत्या ना कोणत्या कारणाने यात अडथळे येत आहेत.
युती नाही –
सोमवारी सकाळी ‘आप’ने काँग्रेसला सांगितले होते की, काँग्रेसने संध्याकाळपर्यंत युतीबाबत निर्णय घेतला नाही तर आम्ही आमची यादी जाहीर करू. अशा परिस्थितीत काँग्रेसकडून आघाडीबाबत कोणतेही संकेत मिळाले नसल्याने आम आदमी पक्षाने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा स्थितीत आता राज्यात आप आणि काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील अशी अटकळ बांधली जात आहे.
📢Announcement 📢
The Party hereby announces the following candidates for the state elections for Haryana Assembly.
Congratulations to all 💐 pic.twitter.com/Ulca3eVppu
— AAP (@AamAadmiParty) September 9, 2024
यामुळे युती तुटली –
सूत्रांवर विश्वास ठेवला तर, AAP आणि काँग्रेस यांच्यातील चर्चा अयशस्वी झाली कारण आम आदमी पार्टी 10 पेक्षा जास्त जागांची मागणी करत होती आणि काँग्रेस 3 पेक्षा जास्त जागा देण्याच्या बाजूने नव्हती. दरम्यान, काँग्रेसचे काही तळागाळातील नेतेही या आघाडीविरोधात सल्ला देत होते.
निवडणुका कधी होणार ?
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर आहे. त्याच वेळी, राज्यात एकाच टप्प्यात म्हणजे 5 ऑक्टोबर रोजी निवडणुका होतील आणि 8 ऑक्टोबरला जम्मू-काश्मीरसोबत मतमोजणी होईल.





