Adani Issue : आपची भाजप मुख्यालयाबाहेर जोरदार निदर्शने

नवी दिल्ली – अदानी समुहाने केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी करत आम आदमी पक्षाने रविवारी येथील भाजप मुख्यालयाबाहेर निदर्शने केली.
पक्षाचे दिल्ली संयोजक गोपाल राय म्हणाले की, अदानींवरील हिंडेनबर्ग अहवालातील आरोप गंभीर असून त्याची संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशी करावी. भाजप चौकशीपासून पळ काढत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हा एकच नेता आहे, जो कोणत्याही तपासाला घाबरत नाही असे ते म्हणाले.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/maharashtra-won-the-overall-title-for-the-third-time-in-the-khelo-india-youth-tournament/
आम आदमी पक्षाने संसदेत या प्रकरणी जोरदार आवाज उठवला होता. या प्रकरणात अन्य विरोधकांनी एकजुटीने जे आंदोलन केले त्यालाही या पक्षाने पाठिंबा दिला होता. परंतु तरीही या प्रकरणात चौकशीला केंद्र सरकार तयार नसल्याने आम आदमी पक्षाने आता रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे.





