Jammu and Kashmir : अदानींवरून लक्ष वळवण्यासाठी काश्मीरचा वापर; मेहबुबा मुफ्तींचा आरोप

श्रीनगर :– जम्मू-काश्मीरमधील अतिक्रमणविरोधी कारवाईचा माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी बुधवारी तीव्र शब्दांत निषेध केला. केंद्र सरकार अदानी प्रकरणापासून देशाचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी जम्मू-काश्मीरचा वापर करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल करण्याची ग्वाही दिल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना मेहबुबा म्हणाल्या, त्यांची वक्तव्ये म्हणजे जुमले असतात.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/maharashtra-elections-for-the-next-phase-of-cooperative-societies-in-the-state-will-be-held/
भाजपने दरवर्षी 2 कोटी रोजगार पुरवण्याचे आणि प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रूपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते निवडणूक जुमले असल्याचे नंतर शहांनीच सांगितले. राज्याचे रूपांतर केंद्रशासित प्रदेशात करणारे शहा हे पहिलेच गृहमंत्री आहेत, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले.





