Economic Survey : केजरीवाल सरकारची चमकदार कामगिरी; नागरिकांचे उत्पन्न वाढले

नवी दिल्ली – 2021-22 च्या आर्थिक सर्वेक्षणात दिल्लीतील केजरीवाल सरकारने चमकदार कामगिरीची नोंद केली आहे. या सरकारने नागरीकांच्या दरडोई उत्पन्नात वाढ तर केलीच आहे पण राज्यही शिलकीत चालवून दाखवले आहे.
शिलकी अंदाजपत्रक सादर करणारे दिल्ली हे देशातले पहिले राज्य ठरले असून सन 2021-22 मध्ये दिल्लीचा जीडीपी 17.65 टक्के इतका वाढला आहे. दिल्ली सरकारच्या महसुलातही मोठी वाढ झाल्याचे या आर्थिक सर्वेक्षणात दिसून आले आहे.
सिक्कीम आणि गोव्यानंतर दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वेक्षणानुसार, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये दिल्लीचे दरडोई उत्पन्न वार्षिक 16.81 टक्क्यांनी वाढून ते 4,01,982 रुपये इतके झाले. 2021-22 या आर्थिक वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल शुक्रवारी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी विधानसभेत सादर केला.
2021-22 मध्ये दिल्लीचे दरडोई उत्पन्न राष्ट्रीय सरासरीपेक्षा तिप्पट होते, असे त्यात म्हटले आहे. 2021-22 मध्ये दिल्लीने 1,450 कोटी रुपयांचा महसूल वाढविला आहे





