Delhi Elections 2025 : “आपचे कार्यकर्ते बुरखा घालून बनावट मतदान करतात..”; दिल्लीत ‘भाजप आणि आप’च्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

Delhi Assembly Elections 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आज (5 फेब्रुवारी) सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष (आप), काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात थेट सामना होणार असल्याचे सांगितले जात आहे.
दिल्लीतील सर्व 70 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. जवळपास 699 उमेदवारांचे भवितव्य आज मतपेठीत बंद होईल. अश्यातच, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा दिल्ली भाजप कार्यालयात पोहोचले असून, यावेळी त्यांनी येथे उभारलेल्या मॉनिटरिंग सेंटरमधून ते दिल्लीतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मतदानाचा आढावा घेतला आहेत. बूथ अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांकडूनही त्यांनी अभिप्राय घेतला आहे. याचा विडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
#WATCH | BJP National President JP Nadda, accompanied by Delhi BJP president Virendraa Sachdeva and Union Minister Harsh Malhotra visits the Delhi BJP office
Delhi is voting on all 70 assembly constituencies; as of 11 am the voter turnout was recorded at 19.95% pic.twitter.com/plH6CGEovU
— ANI (@ANI) February 5, 2025
सीलमपूर परिसरात गोंधळ :
दिल्लीतील सीलमपूर भागात आम आदमी पार्टी आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आले असल्याचं समोर आलं आहे. बुरख्याबाबत हा वाद सुरू झाला आहे. भाजपचा आरोप आहे की, ‘येथे आपचे कार्यकर्ते बुरखा घालून बनावट मतदान करत आहेत’. भाजप कार्यकर्त्यांच्या निदर्शनेदरम्यान आपचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले. सध्या दोन्ही पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांना शांत करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
8 फेब्रुवारीला होणार मतमोजणी :
दरम्यान, दिल्लीत आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर 8 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. दिल्लीत 70 जागांसाठी 699 उमेदवार रिंगणात आहेत. जवळपास 1.56 कोटी नागरिक आज मतदानाचा हक्क बजावतील. 13,766 मतदान केंद्रांवर मतदान पार पडणार असून, यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.





