पुणेः नुकतीच एका संस्थने वाहतूक कोंडी संदर्भात जगभरातील शहरांची क्रमावारी जाहीर केली होती. या क्रमवारीत पुण्याचा जगात चौथा तर देशात तिसरा क्रमांका लागला होता. यावरून पुण्याची वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस किती गहन होत चाललेली आहे, याचा अंदाज लागतो. काही वर्ष सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाचीच ही कर्तबगारी असल्याची टीका आम आदमी पार्टीच्या पुणे शाखेने केली आहे.
याविषयी आप पुणे शाखेच्या वतीने शुक्रवारी सकाळी ११ वाजता साखर संकुल चौकात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पुण्याचे नाचक्की करून मिळेल अशा घोषणा देत याचे संयोजक भारतीय जनता पक्षाचे सत्ताधारीच असल्याचा आरोप करण्यात आला. त्याचबरोबर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुणे शहरातील वाहतूक कोंडीबाबत नाराजी व्यक्त केली होती. याचा दाखला देत याची जबाबदारी सत्ताधिशांनी घेतली नाही, त्यामुळेच वाहतूक कोंडीच्या बाबतीत सातव्या क्रमांकावर असलेले पुणे आता चौथ्या क्रमांकावर आले आहे.
मोठ्या घोषणा यापलीकडे काहीही नाही
दिल्लीत आणि राज्यात काही वर्षांपासून भाजपची सत्ता आहे, मात्र त्यांनी पुणे शहरासाठी मोठ्या घोषणा करण्यापलीकडे काहीही केलेले नाही, अशी टीका करण्यात आली. तसेच या आंदोलनात सुबह शाम सभी रस्ते जाम अशा घोषणाही देण्यात आल्या. या आंदोलनात पक्षाचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत हे देखील सहभागी झाले होते. तसेच यावेळी पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.