Aanchal Mamidwar : सक्षम नसला तरी मी आहे.! आंचल ३ महिन्यातच गेली घर सोडून, मृतदेहाशी लग्न करून आयुष्यभर सासरी राहण्याची घेतली होती शपथ
सक्षमच्या अंत्यसंस्कारावेळी आंचल मामीडवार हिने मृतदेहासमोर विवाहाचे काही विधी पार पाडले होते. दोघांच्या अंगाला हळद लावण्यात आली होती आणि आंचलने सक्षमच्या नावाने कपाळात कुंकू भरले होते.

Saksham Tate | Aanchal Mamidwar : सहा महिन्यांपूर्वी नांदेडच्या इतवारा परिसरात घडलेल्या सक्षम ताटे हत्याकांडाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. प्रेमसंबंधांना विरोध झाल्याने सक्षम ताटे या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर त्याची प्रेयसी आंचल मामीडवार हिने सक्षमच्या मृतदेहाशी विवाहाचे विधी पार पाडल्याने हे प्रकरण राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले होते. आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Aanchal Mamidwar)
सक्षम ताटे आणि आंचल मामीडवार यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, दोघांची जात वेगळी असल्याने आंचलच्या कुटुंबीयांनी या नात्याला तीव्र विरोध केला होता. आरोपानुसार, याच वादातून आंचलचे वडील गजानन मामीडवार तसेच भाऊ हिमेश आणि साहिल मामीडवार यांनी सक्षमची हत्या केली होती.
या घटनेनंतर आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी विवाह केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यावेळी तिने आयुष्यभर सक्षमच्या कुटुंबासोबत राहण्याचा निर्धार व्यक्त केला होता. मात्र, आता ती ताटे कुटुंबाच्या घरातून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे.
सक्षमच्या आईचा दावा.. (Aanchal Mamidwar)
सक्षमची आई संगीता ताटे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत या संपूर्ण घटनेबाबत भावना व्यक्त केल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार, सक्षमच्या मृत्यूनंतर आंचल काही महिने त्यांच्या कुटुंबासोबत राहिली होती. आंचल मला म्हणायची, ‘मम्मी, सक्षमच्या जागी आता मी तुमचा मुलगा आहे. मी तुमची काळजी घेईन आणि कायम तुमच्यासोबत राहीन.’
ती सुमारे साडेतीन महिने आमच्यासोबत राहिली. एक दिवस तिने आजीची तब्येत बिघडल्याचे सांगून तिला भेटण्यासाठी जाण्याची इच्छा व्यक्त केली. मी स्वतः तिला तिच्या घरी सोडून आले. मात्र, त्यानंतर ती पुन्हा कधीच परत आली नाही,” असे संगीता ताटे यांनी सांगितले.
त्यांनी पुढे सांगितले की, आंचल सोशल मीडियावर तिच्या नातेवाईकांच्या संपर्कात होती. तिच्या हालचालींवर किंवा संवादावर कोणतेही बंधन घातले नव्हते. मात्र, ती घरातून गेल्यानंतर पुन्हा संपर्कात आली नाही. ( Aanchal Mamidwar)
सक्षमच्या हत्येनंतर ताटे कुटुंबावर संकटांचे डोंगर कोसळले. मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन करत असतानाच सक्षमच्या वडिलांची प्रकृती खालावली. त्यांना रक्तदाबाचा त्रास होता. अखेर तीन महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले.
“सध्या आंचलशी आमचा कोणताही संपर्क नाही. सक्षम गेला आणि त्यानंतर माझ्या पतीचाही मृत्यू झाला. आता मी एकटीच उरले आहे,” अशी खंत संगीता ताटे यांनी व्यक्त केली.
मृत्यूनंतरही प्रेम कायम असल्याचा आंचलचा दावा… (Aanchal Mamidwar)
सक्षमच्या अंत्यसंस्कारावेळी आंचल मामीडवार हिने मृतदेहासमोर विवाहाचे काही विधी पार पाडले होते. दोघांच्या अंगाला हळद लावण्यात आली होती आणि आंचलने सक्षमच्या नावाने कपाळात कुंकू भरले होते.
त्यावेळी ती म्हणाली होती, “मी सक्षमसोबत लग्न केले आहे. तो आज या जगात नसला तरी आमचं प्रेम जिवंत आहे. मी आयुष्यभर त्याच्या आठवणींसोबत जगणार असून त्याच्या कुटुंबाची साथ सोडणार नाही.” असं ती म्हणाली होती.






