Crime News : शिरुर तालुक्यात विहिरीवरील मोटार चोरीला; अज्ञात व्यक्ती विरोधात पोलिसात गुन्हा दाखल
Updated On:

निमोणे: शिरुर तालुक्यातील निर्वी गावात एका शेतकऱ्याच्या विहिरीवरुन कंपनीची अंदाजे 10 हजार रुपये किंमतीची पाण्यातील इलेक्ट्रीक मोटार चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरुर पोलीस स्टेशन येथे ओमकार अरुण शहाणे (वय 24, व्यवसाय शेती, रा. निर्वी, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि 23 ते 24 जून 2025 च्या दरम्यान त्यांच्या शेतातील विहिरीवर असलेली लक्ष्मी कंपनीची पाण्यातील इलेक्ट्रीक मोटार अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे.
हि घटना निर्वी गावातील धुमाळवाडी कॅनॉल रोडलगत घडली असुन याप्रकरणी शिरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार टेंगळे करत आहे.





