आमिर खानची गर्लफ्रेंडसाठी खाजगी सिक्युरिटी? मीडियाचा तो प्रश्न आणि अभिनेत्याने दिलं स्पष्टच उत्तर म्हणाला

आमिर खान नुकताच ६० वर्षांचा झाला आहे. मुंबईत आमिरने मीडिया आणि पॅपाराझींसोबत आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजारा केला. यावेळी आमिरीने त्याच्या जोडीदारीची ओळख करुन दिली. गौरी स्प्रॅट असे त्याच्या गर्लफ्रेडचे नाव आहे. यानंतर बॅालीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर आणि त्याची गर्लफ्रेड गौरी स्प्रॅट हे दोघेही मोठे चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर या दोघांच्या मोठ्या चर्चा केल्या जात आहे. त्याच्या नव्या लिव्हिंग लाईफबद्दल बोलले जात आहे. आता आमिरनं त्याची गर्लफ्रेड गौरीसाठी खासगी सिक्युरिटी हायर केल्याची बातमी समोर आली आहे.
आम्ही एकमेकांबाबत खूप सिरिअस आणि कमिटेड
माध्यमांशी बोलताना आमिरला गौरी स्प्रॅटसाठी सिक्युरिटी ठेवणार आहे का असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर आमिरीने मी ते आधीच केले आहे. पण हे फक्त माझ्या स्वतःच्या शांतीसाठी आहे, असं गौरी स्प्रॅटची मीडियाशी ओळख करून देताना आमिर खान म्हणाला होता. तसेच “मी अशा व्यक्तीच्या शोधात होतो, जिच्यासोबत मी शांत राहू शकेन, जी मला शांती देऊ शकेल आणि ती हिच आहे. गौरी आणि मी 25 वर्षांपूर्वी भेटलो होतो आणि आता आम्ही जोडीदार आहोत. आम्ही एकमेकांबाबत खूप सिरिअस आणि कमिटेड आहोत. आम्ही दीड वर्षांपासून एकत्र आहोत.” असा खुलासा त्याने माध्यमांशी बोलताना केला होता.
लग्नाबद्दल आमिरला विचारलं अन्….
गौरी स्पॅटशी आमिरीने ओळख करून दिल्यानंतर तिची सलमान आणि शाहरुखनाही ओळख करुन दिल्याचे त्यांनी सांगितले. गौरीशी लग्न करण्याच्या प्रश्नावर आमिरीने उत्तर दिले. तो म्हणाला मला माहित नाही की मला वयाच्या ६० व्या वर्षी लग्न करणं शोभेल की नाही. माझी मुलं खूप आनंदी आहेत. मी खूप भाग्यवान आहे की माझं माझ्या पूर्वाश्रमीच्या पत्नींशी देखील इतके चांगले संबंध असल्याचे त्याने सांगितले आहे.





