आमिर खानच्या ‘पीके’ सिनेमाचा सिक्वल येणार? ‘हा’ अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

Aamir Khan | बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातून पुन्हा एकदा आमिर खान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट २० जून २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यातच आता चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.
पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, आमिर खान आणि राजकुमार हिरानी देखील पीके २ च्या सिक्वेलचा विचार करत आहेत. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पीके’ या चित्रपटाच्या अखेरीस रणबीर कपूरचा प्रवेश दाखवण्यात आला होता, ज्यामुळे सीक्वेलची शक्यता निर्माण झाली होती. आता तो पूर्ण सिक्वेलचे रूप घेणार आहे.
परंतु चित्रपटाच्या निर्मितीची अधिकृत घोषणा अद्याप झाली नाही. यावेळी रणबीर कपूर चित्रपटात एलियनची भूमिका साकारताना दिसू शकतो. सध्या या पटकथेवर काम सुरू झाल्याचेही म्हंटले जात आहे.
View this post on Instagram
‘सितारे जमीन पर’ नंतर आमिर खान आणखी एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात करणार आहे. आमिर दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकवरही काम करणार आहे. हा बायोपिक राजकुमार हिरानी दिग्दर्शित करणार आहेत. ‘लाल सिंग चढ्ढा’च्या अपयशानंतर आता पुन्हा एकदा आमिर खान सक्रिय झाला आहे.
हेही वाचा :




