आमिर खान गुरुनानकांच्या भूमिकेत? पोस्टर मागचे सत्य समोर…

Aamir khan | अभिनेता आमिर खानचा गुरुनानक यांच्या लूकमधील एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टरमध्ये आमिरला ‘गुरु नानक’ यांच्या लूकमध्ये दाखवण्यात आलं आहे आणि त्यासोबतच लवकरच ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
ज्यानंतर आमिर खान आगामी चित्रपटात गुरु नानक यांच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र या पोस्टरचे सत्य आता समोर आले असून आमिरच्या टीमने या व्हायरल होणाऱ्या पोस्टरवर स्पष्टीकरण दिले आहे.
आमिर खानचे स्पोक्सपर्सननं सांगितलं की, ‘आमिरला गुरुनानक यांच्या रुपात दाखवण्यात आलेलं हे पोस्टर फेक आहे आणि जे AI नं बनवलं आहे. आमिर खानला अशा कोणत्याही चित्रपटासाठी काही संबंध नाही आहे. तर गुरुनानक यांचा तो खूप सन्मान करतो आणि कधीच काही अपमान होईल असं काही करणार नाही. त्यामुळे कृपया खोट्या बातम्या पसरवू नका,’ अशी विनंती देखील करण्यात आली आहे. Aamir khan |
आमिरच्या कामाविषयी बोलायचं झालं तर, तो लवकरच ‘सितारे जमीन पर’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 20 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. आमिर शेवटचा 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटात दिसला होता. मात्र हा चित्रपट फ्लॉप ठरला. Aamir khan |
हेही वाचा:





