Ira Khan : आमिर खाननं लेक आयराला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. सध्या आमिर खान लेक आयरा खानमुळे (Ira Khan) चर्चेत आहे. आयराने एका मुलाखतीत म्हंटले होते कि की ती (Ira Khan) 26-27 वर्षांची असून तिला या गोष्टीचं वाईट वाटतं की ती पैसे कमावत नाही आणि आयुष्यात काहीच करत नाही. यावर वडील आमिर खानने तिला एक मोलाचा सल्ला दिला.
आमिर खान म्हणाला ‘काही लोकं, त्यांना काम येतं आणि ते लोकं त्या बदल्यात पैसे आकारतात. जोपर्यंत मी लोकांच्या कामी येतो आणि त्या बदल्यात मी पैसे घ्यायचे की नाही ती वेगळी गोष्ट आहे. तुम्ही लोकांच्या कामी यायला हवं. हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं.’ आमिरनं त्याची लेक आयराला सांगितलं की ‘तू इतक्या लोकांची मदत करतेस. एक वडिलाच्या रुपात माझ्यासाठी हे खूप आहे.
तू पैसे कमावतेस की नाही, ते माझ्यासाठी काही महत्त्वाचं नाही. तू काम चांगलं करतेस ना हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.’ तसेच आमिर पुढे म्हणाला, ‘मी इराला सांगितलं की तुम्हाला तुमच्या आयुष्याचा अर्थ समजणं महत्त्वाचं आहे आणि तुम्ही लोकांच्या कामी यायला हवं. आयरा (Ira Khan) बद्दल बोलायचे झाले तर मानसिक आरोग्य आणि कल्याण संगठण ‘अगत्सु’ ची संस्थापक आणि सीईओ आहे.





