Aamir Khan to Visit Kunariya Village: बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अमीर खान तब्बल २५ वर्ष्यानंतर पुन्हा एकदा ‘लगान ‘ चित्रपटाचं शूट झालेल्या गावी जाणार आहे. गुजरात मधल्या भुज जवळ ‘कच्छ’ परिसरातीतलं छोटसं’ गाव चंपानेर (काल्पनिक नाव) जिथे २००१ साली ‘लगान ‘चं चित्रीकरण झालं होत. तिथे आमिरची पुन्हा एकदा वारी होणार आहे. यामागचं कारण आहे त्याचा सुपरहिट आणि भावनिक ‘सितारे जमीन पर‘ या चित्रपटाचा डिजिटल रिलॉन्च. हा चित्रपट युट्युबवर ‘Movies on Demand’ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला असून त्याला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आमीर भावुक झाला आहे. त्याच भावनेतून आमिरने ठरवलं आहे की,’लगान‘ने भारतीय सिनेसृष्टीला केवळ एक ऐतिहासिक चित्रपटच नाही, तर ऑस्करपर्यंत पोहोचवलेलं एक स्वप्न दिल होत. त्या चित्रपटातील गाव, तिथले कलाकार, स्थानिक लोक सगळं काही आमिरच्या मनात आजही ताज आहे. यावेळी अमीर त्या गावी फक्त भेट देणार नाही, तर स्थानिक लोकांसोबत संवाद साधणार आहे.काही सामाजिक उपक्रमात सहभाग घेणार आहे. आणि सितारे जमीन पर मधील शिक्षणावरील संदेश पुन्हा एकदा गावपातळीवर पोहोचवणार आहे. ‘लगान’आणि’सितारे जमीन पर’ दोन्ही चित्रपट सामाजिक संदेश देणारे ठरले होते.एकाने देशभक्तीचं दर्शन घडवलं,तर दुसऱ्याने मुलांच्या भावविश्वाला स्पर्श केला.आणि आता २५ वर्ष्यानंतर आमीर त्या दोन्ही आठवणी एकत्र गुंफताना दिसणार आहे.