Aamir Khan: हातात हात धरून आमिर-गौरीची एन्ट्री; मेलबर्न फेस्टिव्हलमध्ये चाहत्यांची नजर

Aamir Khan And Gauri Spratt: मेलबर्नमध्ये सुरू झालेल्या इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न (IFFM 2025) मध्ये बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान प्रेयसी गौरी स्प्राटसोबत उपस्थित राहिला. किरण रावसोबत घटस्फोटानंतर आमिरच्या वैयक्तिक आयुष्यातील ही पहिलीच मोठी सार्वजनिक उपस्थिती असून त्यामुळे चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर या जोडीची चर्चा रंगली आहे.
हातात हात धरून एन्ट्री
महोत्सवाच्या रेड कार्पेटवर आमिर आणि गौरी स्प्राट हातात हात धरून दिसले. गर्दी आणि पापाराझींच्या कॅमेऱ्यांमध्ये दोघांनी एकमेकांचा हात घट्ट धरला होता. यावेळी आमिरने गौरीची विशेष काळजी घेतली. चेहऱ्यावर उमटलेले स्मित आणि आत्मविश्वास पाहून चाहत्यांनीही या जोडीला शुभेच्छांचा वर्षाव केला.
लूकवर झाली चर्चा
रेड कार्पेटवर आमिर खानने काळ्या रंगाचा गाला स्टाईल कोट घातला होता. तर गौरी स्प्राट निळ्या रंगाच्या पारंपरिक सलवार सूटमध्ये दिसली. दोघांचाही साधा पण आकर्षक लूक चाहत्यांना विशेष भावला. पापाराझींनीही या जोडीचे फोटो आणि व्हिडिओ टिपले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी प्रतिक्रिया देत म्हणत आहेत. “हातात हात, चेहऱ्यावर हसू, खूप छान दिसताय दोघंही.”
View this post on Instagram
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
आमिर आणि गौरीचा एकत्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या जोडीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. काहींनी आमिरच्या नव्या नात्याला शुभेच्छा दिल्या, तर काहींनी “आमिर पुन्हा एकदा खऱ्या प्रेमात दिसतोय” अशा प्रतिक्रिया दिल्या.
इतर सेलिब्रिटींची उपस्थिती
IFFM 2025 च्या पत्रकार परिषद व उद्घाटन सोहळ्यात आमिर-गौरी व्यतिरिक्त अनेक नामांकित कलाकार व दिग्दर्शक उपस्थित होते. त्यामध्ये अभिनेता वीर दास, अभिनेत्री तिलोत्तमा शोम, अदिती राव हैदरी,अभिनेता जिम सर्भ, जयदीप अहलावत,दिग्दर्शक शुजित सरकार, अश्विनी अय्यर तिवारी, आर.एस. प्रसन्ना, गायिका लिसा मिश्रा, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राया सर्व कलाकारांच्या उपस्थितीमुळे महोत्सवाची रंगत अधिकच वाढली.
आमिरची खास एन्ट्री ठरली चर्चेचा विषय
संपूर्ण कार्यक्रमात आमिर खानची एन्ट्री आणि त्याच्या सोबत गौरी स्प्राटचा सहभाग हा सर्वाधिक चर्चेचा मुद्दा ठरला. रेड कार्पेटवर हातात हात धरून आलेल्या या जोडप्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.





