Aam Aadmi Party | आम आदमी पक्षाला (आप) गुजरातमध्ये मोठा धक्का बसला आहे. एकीकडे विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना पक्षाचे वरिष्ठ नेते चेतन रावल यांनी अचानक पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे रावल यांनी म्हटले आहे. मात्र त्यांच्या अचानक राजीनामा देण्याच्या निर्णयामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे. गुजरातमधील पक्षाचे प्रमुख इशुदान गढवी यांना चेतन रावल यांनी राजीनामा दिला आहे. यात रावल यांनी वैयक्तिक कारणांमुळे तात्काळ प्रभावाने आम आदमी पक्षाचा राजीनामा देत असल्याचे म्हंटले आहे. Aam Aadmi Party | कोण आहेत चेतन रावल ? चेतन रावल हे माजी टीव्ही अभिनेते असून गुजरातमधील अहमदाबाद येथील प्रमुख राजकीय व्यक्तिमत्त्व आहेत. रावल यांचे वडील प्रबोध रावल हे देखील काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते आणि गुजरातचे गृहमंत्रीही राहिले आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत ते काँग्रेसमध्ये सक्रिय झाले आणि अहमदाबाद शहराचे काँग्रेस अध्यक्ष बनले. मात्र पक्षाकडून बाजूला ठेवले जात असल्याचे सांगत ते आम आदमी पक्षात सामील झाले होते. 2022 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन ‘आप’मध्ये प्रवेश केला होता. ते अहमदाबाद शहराचे काँग्रेस अध्यक्ष आणि राज्य सरचिटणीसही राहिले आहेत. त्यांनी असारवा आणि खाडिया मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली आहे. परंतु तीन वर्षांनंतर आता त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्ष देखील सोडला आहे. यानंतर आता त्यांची पुढची भूमिका काय असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. Aam Aadmi Party हेही वाचा: Pune News | खराब हवामानामुळे पुणे-दिल्ली विमान हैदराबादला वळविले