मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वाधिक चर्चेतील एक मुद्दा म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार का? आगामी काळात मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रासाठी बंधू उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येऊ, असे ते म्हणाले होते. यानंतर आता आमदार आदित्य ठाकरे यांनी मनसेतील वरिष्ठ नेत्यांना चर्चेसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनानंतर आता मनसेकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहणे देखील महत्त्वाचे आहे. दोन्ही बाजूने केवळ मीडियामध्ये एकत्र येण्याची बात झाली आहे. दोन्ही बाजूने समोरासमोर चर्चा झाली आहे. महाराष्ट्र, समाज, देश हितासाठी कुणीही स्वच्छ मनाने या भ्रष्ट सरकारच्या विरोधात जो महाराष्ट्र विरोधी आहे, त्यांच्या विरोधात कुणी खुल्या मनाने सोबत येत असेल तर त्यांचं स्वागत आहे”, असे आदित्य ठाकरे म्हणाले. आमचे एकच म्हणणे आहे, जेव्हा तिथून काही बात झाली तेव्हा आम्ही प्रतिसाद दिला. कोण म्हणाले ते मला माहिती नाही. पण त्यांच्या वरिष्ठांकडून कोणीतरी पुढे यावे. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की, आम्ही जिथे आहोत तिथेच आहोत. या महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्रद्वेष्टी भाजप आहे, त्यांच्याविरोधात कोणी एकत्र येत असील तर त्यांचे आम्ही स्वागत करु”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.